मुंबई

मुंबई विमानतळ टर्मिनल १चे एप्रिल २०२७पासून पाडकाम

CD

मुंबई विमानतळ टर्मिनल १चे
एप्रिल २०२७पासून पाडकाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) टर्मिनल-१च्या पुनर्विकासाची प्रक्रिया एप्रिल २०२७पासून सुरू होणार आहे. नव्या टर्मिनलचे काम डिसेंबर २०३०पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यानंतर टर्मिनलची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता दीड कोटींवरून दोन कोटींपर्यंत वाढणार आहे. सीएसएमआयएने एअरपोर्ट एअरलाइन ऑपरेटर्स कमिटीच्या बैठकीत प्रस्तावित टर्मिनलच्या संकल्पनात्मक प्रतिमा सादर केल्या.

१९६४मध्ये कार्यान्वित झालेले टर्मिनल १ सुमारे सहा दशके जुने आहे. ‘स्ट्रक्टवेल’ने २०१७मध्ये आणि आयआयटी मुंबईने २०२४मध्ये केलेल्या स्वतंत्र पाहणीत टर्मिनलच्या सुरक्षितता आणि संरचनात्मक स्थितीबाबत त्रुटी निदर्शनास आल्याचे सीएसएमआयएने म्हटले आहे. त्यामुळे जुने टर्मिनल पाडून त्या जागी आधुनिक टर्मिनल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नव्या टर्मिनलमध्ये प्रशस्त आणि स्तंभविरहित चेक-इन हॉल, नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर, मुंबईच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी कलाकृती, अंतर्गत हिरवळ, प्रीमियम लाउंज आणि धावपट्टीकडे दिसणाऱ्या विस्तीर्ण काचेच्या दर्शनी भागाची संकल्पना आहे. आगमन परिसरात मुंबईच्या जैवविविधतेचे प्रतीक म्हणून भव्य फ्लेमिंगो शिल्प प्रस्तावित आहे.

टर्मिनल-१चे पाडकाम सुरू असताना देशांतर्गत विमानसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी टर्मिनल-२च्या उत्तर-पश्चिम भागात ‘जी+३ पिअर’चा विस्तार केला जाणार आहे. हा विस्तार मार्च २०२९पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे सीएसएमआयएने सांगितले.
==
प्रवासी सुविधांमध्ये वाढ
सध्या असलेले ७४ चेक-इन काउंटर वाढवून १०९ करण्यात येणार आहेत. सुरक्षा तपासणीसाठी १५ प्रवासी आणि पाच ट्रान्स्फर लेन असतील. विमानांसाठीचे ‘कॉन्टॅक्ट स्टँड’ सातवरून २५ करण्यात येणार असून, १२ अत्याधुनिक ई-गेट्स उभारण्याची योजना आहे. बॅगेज रिक्लेम बेल्टची संख्या पाचवरून ११ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT