दहा आस्थापनांचे परवाने निलंबित
मसाले विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : भेसळयुक्त आणि असुरक्षित मसाल्यांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत कारवाईचा धडाका लावला आहे. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुंबईतील मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या १२३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५४ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये मुंबई सेंट्रल येथील हिंदुस्तान मसाला ग्राइंडिंग मिल्स, सांताक्रूझ पूर्व येथील गूसबम्प्स पिकल्स, अंधेरी पश्चिम येथील न्यू बॉम्बे मसाला शॉप आणि राठोड मसाला शॉप, वांद्रे पश्चिम येथील जॅफसन, सांताक्रूझ पश्चिम येथील श्री गजानन मसाला स्टोअर्स, घाटकोपर पूर्व येथील सी. एम. मसाला, मुलुंड पश्चिम येथील ठक्कर ट्रेडर्स, दहिसर पूर्व येथील पूर्विन इंडस्ट्रीज आणि भांडुप पश्चिम येथील अनंता फूड प्रॉडक्ट यांचा समावेश आहे. राज्यभरात मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत १,०५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८४ परवाने निलंबित करण्यात आले असून, सुमारे १९ कोटी ७० लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.