मुंबई

कसारा मार्गावर दोन रात्री ब्लॉक

CD

कसारा मार्गावर दोन रात्री ब्लॉक
लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा यार्डात ओव्हरहेड वायरची जोडणी करण्यात येणार आहे. यासाठी ३० आणि ३१ ऑक्टोबरच्या रात्री विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील, तर कसारा येथून सुटणाऱ्या दोन लोकलना उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबा मिळणार नाही.
३० ऑक्टोबरच्या रात्री ते ३१ ऑक्टोबरच्या पहाटे आणि ३१ ऑक्टोबरच्या रात्री ते १ नोव्हेंबरच्या पहाटे हा ब्लॉक घेण्यात येईल. दोन्ही दिवशी रात्री ३ ते ५.३० या वेळेत ब्लॉक असेल. उंबरमाळी-कसारा यादरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गिकांवर ओव्हरहेड वायर जोडणीचे काम केले जाणार आहे.
३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला दानापूर-एलटीटी विशेष, बल्हारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, रक्सौल-एलटीटी कर्मभूमी एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस, लिंगमपल्ली-सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट-सीएसएमटी पंजाब मेल, नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस आणि राणी कमलापती-एलटीटी एक्स्प्रेस कसारा-खर्डी यादरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरून चालविण्यात येतील. त्यामुळे या गाड्यांना १५ ते २० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरला सहरसा-एलटीटी आणि शालीमार-एलटीटी एक्स्प्रेसलाही विलंब होऊ शकतो.
...
दोन लोकलचे थांबे रद्द
कसारा येथून पहाटे ३.५१ आणि ४.५९ वाजता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी येथे अनुक्रमे सकाळी ६.३० व ७.३८ वाजता पोहोचणाऱ्या लोकल कसारा ते कल्याणदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरून धावतील. त्यामुळे या लोकलना उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबा मिळणार नाही. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT