‘जनशताब्दी’सह १८ गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द
राज्यात नवी वर्गवारी; प्रवाशांना तिकीटदरात दिलासा?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : राज्यातील १८ रेल्वे गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने वेगवान प्रवास मंदावणार आहे. महानगरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा यात समावेश असून, १ जानेवारीपासून या गाड्यांची वर्गवारी साध्या एक्स्प्रेसमध्ये केली जाणार आहे. सुपरफास्ट दर्जा काढण्यामागील कारण आणि तिकीटदरात किती फरक पडणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
नऊ जोड्यांतील या १८ गाड्यांची नॉन-सुपरफास्ट म्हणून फेरवर्गवारी करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२७ पासून त्यांना नवीन क्रमांकांनुसार धावणार आहेत. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेसचा क्रमांक १२०७१ ऐवजी ११०६९, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेसचा क्रमांक १२१२५ ऐवजी ११४३५, तर सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेसचा क्रमांक २२१७७ ऐवजी ११०९३ होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट तुलसी एक्स्प्रेसचा क्रमांकही २२१२९ ऐवजी ११०६५ करण्यात येणार आहे. या गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या दोन्ही सेवांचे क्रमांक बदलणार असल्याने प्रवाशांना आरक्षण करताना नवीन क्रमांक तपासावा लागणार आहे.
नऊ जोड्या गाड्यांचा समावेश
जनशताब्दी, प्रगती, महानगरी आणि तुलसी एक्स्प्रेससह तिरुअनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, करमाळी वातानुकूलित एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेस याचा या निर्णयात समावेश असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
अतिरिक्त शुल्क रद्द?
सुपरफास्ट गाड्यांच्या तिकिटांसाठी नियमित प्रवासभाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारले जाते. वर्गवारी बदलल्यानंतर हे शुल्क रद्द केल्यास प्रवाशांच्या तिकीटदरात कपात होऊ शकते. दरम्यान, प्रत्यक्ष भाड्यात किती कपात होणार, याची माहिती रेल्वेने दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.