मुंबई

एमबीबीएस, बीडीएसचे यंदा ९८.७९ टक्के प्रवेश

CD

एमबीबीएस, बीडीएसचे यंदा ९८.७९ टक्के प्रवेश

मुंबई, ता. २९ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या व रिक्त जागांच्या तीन प्रवेश फेऱ्या अशा या वर्षी प्रवेशाच्या सहा फेऱ्या पार पडल्या. यामध्ये राज्यातील ९९ वैद्यकीय महाविद्यालयांत ११,४३१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यापैकी ११,२९३ म्हणजे ९८.७९ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व एकूण १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत.
राज्यात ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५,०६५ जागा आहेत. यापैकी ५,०६५ म्हणजे १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ३,२९९ जागा आहेत. यापैकी ३,२६० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ३९ जागा रिक्त आहेत. दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या ४५० जागा आहेत. यापैकी ४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ४५ जागा रिक्त आहेत. राज्यात पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या ३१७ जागा आहेत. यापैकी ३१५ म्हणजे ९९.३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. दोन जागा रिक्त आहेत. २३ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या २,२०० जागा आहेत. यापैकी २,१७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व २२ जागा रिक्त आहेत. एका खासगी वैद्यकीय विद्यापीठात बीडीएसच्या १०० जागा आहेत. यापैकी ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ३० जागा रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT