मुंबई

गरिबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा

CD

गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा
वांद्रे टर्मिनस विस्ताराचा मार्ग मोकळा; पायाभूत सुविधांचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : वांद्र्याच्या गरीबनगर परिसरातील उर्वरित ९४ बांधकामे पाडण्याची कारवाई पश्चिम रेल्वेकडून शुक्रवारी (ता. ३०) हाती घेण्यात आली. दुपारपर्यंत ही सर्व ९४ बांधकामे हटविण्यात आली. यापूर्वी मे २०२६ मध्ये पश्चिम रेल्वेने मोठी निष्कासन मोहीम राबवली होती.
पात्र असलेल्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ही ९४ बांधकामे राखून ठेवण्यात आली होती. आता एमएमआरडीएने या सर्व पात्र कुटुंबांना पर्यायी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली असून, त्यांचा ताबाही सोपवला आहे. त्यामुळे उर्वरित बांधकामे हटवून जागा मोकळी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडील बाजूस महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
...
फलाट क्रमांक आठची उभारणी
गरीबनगरमधील जागा मोकळी झाल्याने वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडील बाजूस एकात्मिक रेल्वे संकुल विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या परिसरात आठव्या फलाटाची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर गाड्या उभ्या करण्याच्या सुविधांचा विस्तार, रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी तसेच देखभालीशी संबंधित पूरक सुविधांचे स्थलांतर आणि विकास करण्यात येणार आहे. परिसरात प्रवासी सुविधांमध्ये वाढ होणार आहे.
...
वांद्रे टर्मिनसच्या क्षमतेत वाढ
सध्या वांद्रे टर्मिनसमधून दररोज सुमारे २० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविल्या जातात. प्रस्तावित विस्ताराची कामे पूर्ण झाल्यानंतर ही संख्या ३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सध्या दररोज सुमारे ६० हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. विस्तारानंतर आणखी ३० हजार प्रवाशांची भर पडून ही संख्या ९० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
...
फलाटांचा विस्तार
सध्या वांद्रे टर्मिनसवरील फलाटांवर १८ ते २२ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. भविष्यात २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याच्या दृष्टीने फलाटांची लांबी वाढविण्याचे नियोजन आहे. याशिवाय स्थानक परिसरात १० अतिरिक्त उपमार्गिका विकसित करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : नवी मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेना आक्रमक; तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाणे-बेलापूर महामार्ग रोखला

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT