मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर दिवसा लोकल सेवा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.
...
मध्य रेल्वे ः
कुठे - सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
...
ट्रान्स हार्बर मार्ग ः
कुठे - ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी, नेरूळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या, तसेच वाशी, नेरूळ आणि पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील.
...
पश्चिम रेल्वे ः
कुठे - बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी - शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार-वसई रोड ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.