मुंबई

मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळाबाजार उघड

CD

मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळाबाजार उघड
रिलायन्स, ब्लिंकिट, झोमॅटोच्या गोदामांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुदतबाह्य, खराब तसेच नाकारलेले अन्नपदार्थ विल्हेवाट लावण्याऐवजी पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचा गंभीर प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष मोहिमेत उघडकीस आला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल पाच कोटी १४ लाख ४० हजार ४० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि वितरण व्यवस्थेतील अनियमितता समोर आली आहे.

‘एफडीए’ने ऑक्टोबरमध्ये ही विशेष शोधमोहीम राबवली. भिवंडी, अंबरनाथ, तुर्भे, चाकण आणि निघोजे परिसरातील गोदामे, वितरण केंद्रे, शीतगृहे तसेच किरकोळ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर यांसारख्या कंपन्यांशी संबंधित गोदामांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्याने सहा आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असून, दोन प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुर्भे येथील मे. सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेज येथे सर्वाधिक अन्नसाठा आढळून आला. या शीतगृहात मुदतबाह्य, विनालेबल तसेच लेबलविषयक त्रुटी असलेला तब्बल ९१ हजार ३५३ किलो अन्नसाठा आढळला. त्याची बाजारमूल्य किंमत चार कोटी १२ लाख ५३ हजार ३०० रुपये असल्याचे समोर आले आहे. या साठ्यात सुकामेवा आणि मसाल्यांचा समावेश होता. एफडीएने तपासणीसाठी ३२ नमुने घेतले असून, संबंधित शीतगृहाचा परवाना निलंबित केला आहे.

‘ब्लिंक कॉमर्स’वर कारवाई
भिवंडीतील पागाव परिसरातील ब्लिंक कॉमर्सच्या गोदामातही मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांचा मोठा साठा आढळला, या तपासणीदरम्यान १८ हजार ४०५ नग अन्नपदार्थांची किंमत ३२ लाख ७१ हजार ७७४ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या अन्नपदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावल्याची आवश्यक कागदपत्रे कंपनीकडून सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे संबंधित कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे ३१ ऑक्टोबरच्या परीक्षा रद्द, आता ११ नोव्हेंबरला होणार!

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT