बीडमधील दोन लाख झाडे दाखवा ः साटम
ठाकरे बंधूंना आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पर्यावरणाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत असून, पर्यावरणावर बोलणे ही त्यांच्यासाठी केवळ फॅशन झाली आहे, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केली. मध्य वैतरणा धरणाच्या उभारणीसाठी वृक्षतोड झाल्यानंतर त्याच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ५४० हेक्टर क्षेत्रावर लावण्यात आलेली दोन लाख झाडे ठाकरे बंधू आणि काँग्रेसने जाऊन दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले.
कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना साटम यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. मध्य वैतरणा धरणासाठी झाडे कापल्यानंतर पर्यायी वृक्षलागवडीसाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. त्यामुळे बीडमधील या वृक्षलागवडीची पाहणी करून विरोधकांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, असे ते म्हणाले. कर्जतचा प्रस्तावित प्रकल्प तीन हजार मेगावॅट क्षमतेचा असून, ३७७ हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणार आहे. हा स्वच्छ ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प असून, शाश्वत विकास ही भाजपची बांधिलकी आहे; मात्र विरोधक विकासकामांना विरोध करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप साटम यांनी केला.
...
विकासात अडथळे
भारताची पंप स्टोरेज वीज क्षमता ७.४३ गिगावॅट असून, चीन आणि जपानच्या तुलनेत ती कमी असल्याचेही अमित साटम यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासात अडथळे आणण्यासाठी काँग्रेस, ठाकरे गट आणि अन्य विरोधक एकत्र आल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर राजकीय निशाणा साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.