मुंबई

कुख्यात गुंड छोटा राजनसह पाच जणांची निर्दोष सुटका

CD

कुख्यात गुंड छोटा राजनसह पाच जणांची निर्दोष सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : शिवसेना नेते अजय भोसलेवर २००९ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजनसह पाच जणांची शुक्रवारी (ता.३०) निर्दोष सुटका केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ११ ऑक्टोबर २००९ रोजी पुण्याच्या कोरेगाव भागात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अजय भोसलेवर गोळ्या झाडल्या होत्या, या हल्ल्यात अजय भोसले सुदैवाने बचावले.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. नरेंद्रनाथ प्रधान यांनी राजन याच्यासह व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल, शकीब आलम खान, राजेश यादव आणि विजय पुरुषोत्तम साळवी यांची त्यांच्यावरील सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करत असल्याचे निकाल देताना स्पष्ट केले. सरकारी पक्षाच्या आरोपांनुसार, हा हल्ला सुरेंद्र अग्रवाल आणि त्याचे भाऊ आर. के. अग्रवाल व व्ही. के. अग्रवाल यांच्यातील मालमत्तेच्या वादातून झाला होता. सुरेंद्रने राजनच्या कथित साथीदाराच्या मदतीने आर. के. अग्रवाल यांच्यावर कौटुंबिक मालमत्तेतील हिस्सा देण्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. भोसले हे आर. के. अग्रवाल यांचे मित्र होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्याद्वारे करण्यात आला होता, मात्र, २०१५ मध्ये राजनला भारतात परत आणल्यानंतर, त्याच्याविरुद्धच्या ७१ प्रकरणांपैकी हे एक प्रकरण राज्य सरकारच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT