मुंबई

प्रदूषण रोखण्यासाठी ११ कोटींचे कंत्राट वादात

CD

प्रदूषण रोखण्यासाठी ११ कोटींचे कंत्राट वादात
कोट्यवधींचा खर्च; तपासणी मात्र कासवगतीने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्ता मोजणाऱ्या सेन्सरची कार्यक्षमता तपासण्यासाठी महापालिकेने तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचे कंत्राट प्रस्तावित केले आहे. या कामासाठी मे. महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून, तीन वर्षांच्या कालावधीत पावसाळा वगळून ७५० दिवसांत नऊ हजार सेन्सर मॉनिटर्सची तपासणी केली जाणार आहे. मात्र, या निविदेतील तरतुदी आणि तपासणीच्या संथ प्रक्रियेवर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने १ जानेवारी २०२५ला दिलेल्या निर्देशांनुसार सर्व बांधकामांच्या ठिकाणी सेन्सरआधारित हवेच्या गुणवत्तेची मोजमाप यंत्रणा आणि एलईडी डिस्प्ले बसवणे तसेच ही यंत्रणा केंद्रीय मॉनिटरिंग प्रणालीशी जोडणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सेन्सर मॉनिटर्सच्या कार्यक्षमतेची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ११ कोटी १० लाख २६ हजार ९४० रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला होता. या कामासाठी १७ जुलै २०२६ला निविदा मागविण्यात आल्या. चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी दोन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या. महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स आणि अश्वमेध इंजिनियर्स या दोन कंपन्या पात्र ठरल्या. दरम्यान, या निविदेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत अश्रफ आझमी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर निविदा काढण्यासाठी तब्बल २२ महिन्यांचा विलंब का झाला, असा सवाल उपस्थित केला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार तीन हजार बांधकाम स्थळे असताना दररोज केवळ १२ ठिकाणांची तपासणी होणार असल्यास सर्व ठिकाणांची तपासणी पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागेल. त्यामुळे काही बांधकाम स्थळे वर्षभर तपासणीविना राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कारवाईची तुरतूद नाही!
तपासणीदरम्यान एखाद्या ठिकाणचे सेन्सर सदोष आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कोणती कारवाई होणार, याची स्पष्ट तरतूद निविदेत नसल्याचा दावाही त्यांनी केला. दंडात्मक कारवाईची तरतूद नसताना प्रदूषण नियंत्रण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित करीत निविदा तयार करणाऱ्या आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अश्रफ आझमी यांनी केली आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

Numerology Personality Prediction : समोर बोलतात खूप गोड, पण डोक्यात चाललेला असतो वेगळाच गेम! 'या' जन्मतारखांचे लोक असतात भलतेच चलाख; ओळखणे अशक्य

Marathi News Live Updates : 'नॅफ्स्कॉब'च्या संचालकपदी ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला

MPSC Student : विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वंकष धोरणाची गरज; वेळापत्रक, आर्थिक मदत, भोजन आणि निवासाच्या सुविधांसारख्या विशेष उपाययोजनांची मागणी

Vidyadhar Anaskar : ‘नॅफ्स्कॉब’च्या संचालकपदी विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT