मुंबई

मुंबई विद्यापीठाची महासागर संशोधनात भरारी

CD

मुंबई, ता. १ : सागरी विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपले स्थान अधिक भक्कम करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशाच्या सागरी अर्थव्यवस्थेला (ब्लू इकॉनॉमी) चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या हैदराबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. टी. श्रीनिवास कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राचे संचालक डॉ. टी. एम. बालकृष्णन नायर यांच्यात हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात कराराचे हस्तांतरण करण्यात आले. या करारामुळे सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण कोकण किनारपट्टीवर सागरी संशोधन, तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करारांतर्गत मुंबई विद्यापीठ आणि इनकॉइस यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन केंद्र स्थापन करण्याची संकल्पना आहे. या केंद्राच्या माध्यमातून सागरी क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग आणि सागरी अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या आधुनिक महासागर विज्ञान सेवा विकसित केल्या जाणार आहेत.

संभाव्य धोक्यांबाबत जनजागृती
किनारपट्टीवरील नागरिकांची नैसर्गिक आपत्तींबाबतची सज्जता वाढविणे, हा या सहकार्याचा महत्त्वाचा भाग असेल. त्सुनामी, वादळी लाटा, समुद्रातील उंच लाटा, स्वेल सर्ज आणि समुद्राच्या पातळीत होणारे बदल यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत जनजागृती, पूर्वसूचना आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि वेंगुर्ला किनारपट्टीवरील समुदायांना हवामान बदल आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट या करारातून साध्य केले जाणार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रासोबत सामंजस्य करार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

SCROLL FOR NEXT