मुंबई

ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने ‘हार्बर’चा खोळंबा

CD

ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने ‘हार्बर’चा खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने शनिवारी (ता. ३१) सकाळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळित झाली. शिवडी रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल विविध स्थानकांवर रखडल्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ओव्हरहेड वायरमधील कपडा हटवल्यानंतर सुमारे २९ मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झाली.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शिवडी स्थानकातील फलाट क्रमांक दोनजवळ शनिवारी सकाळी ९.४४ वाजता ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल विविध स्थानकांवर उभ्या राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला कपडा हटवण्याची कार्यवाही करीत सकाळी १०.१३ वाजता मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे २९ मिनिटांनंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, रखडलेल्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागला.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रेल्वे मार्गालगतच्या परिसरातून कपडे, प्लॅस्टिक किंवा अन्य वस्तू उडून ओव्हरहेड वायरमध्ये अडकण्याच्या घटना घडत आहेत. २६ ऑक्टोबरला मुलुंड-ठाणे स्थानकांदरम्यान दुसरी तार अडकल्याने लोकल सेवा विस्कळित झाली होती. आता शिवडी येथे कपडा अडकल्याने पुन्हा वाहतुकीवर परिणाम झाला. ओव्हरहेड वायरमध्ये अशा वस्तू अडकू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT