मुंबई

बेस्टच्या बोनसवरून भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई!

CD

बेस्टच्या बोनसवरून भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय श्रेयवाद सुरू झाला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्ट भवनात जाऊन कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्याने बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी नाराजी व्यक्त केली. बोनसबाबत बेस्ट प्रशासन किंवा अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याआधी इतर व्यक्तींकडून बोनसची घोषणा कशी होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली होती. या मागणीसाठी संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. बेस्ट समितीच्या बैठकीतही बोनसच्या मुद्द्यावर चर्चा झाली. नियमानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबतची घोषणा बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक हे संयुक्तपणे करतात; मात्र प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतल्यानंतर बेस्ट भवनात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला. विशेष म्हणजे बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असताना भाजपच्या नेत्याने परस्पर बोनस जाहीर केल्याने राजकीय चर्चेला सुरुवात झाली. लाड यांच्या घोषणेनंतर अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी नाराजी व्यक्त केली. बोनसबाबत अधिकृत निर्णय आणि घोषणा झालेली नसताना अशी घोषणा कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर विश्वासराव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत!" राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; भाजपकडून 'इंडिया' आघाडीच्या मॉक पार्लमेंटवर सडकून टीका

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT