मुंबई

दिवाळी फराळाचा व्यवसाय थंडावला!

CD

दिवाळी फराळाचा व्यवसाय थंडावला!
कच्च्या मालासह मजुरीचे दर वाढले; ऑनलाइन स्पर्धेचाही फटका
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत करंजी, चकली, चिवडा, लाडू, अनारसे, शंकरपाळे असा पारंपरिक फराळ बाहेरून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरगुती फराळ व्यावसायिकांचा या काळात बोलबाला असतो, मात्र यंदा महागाई, युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले खर्च आणि ऑनलाइन खाद्यविक्रीतील वाढती स्पर्धा यांची घरगुती फराळ व्यावसायिकांना झळ बसत आहे.
कच्च्या मालाच्या किमतींसह मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याच वेळी ग्राहकांकडून येणाऱ्या ऑर्डरमध्येही घट झाली आहे. परिणामी, फराळाच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळत नसून यंदाच्‍या व्‍यवसायाचे ‘ना नफा, ना तोटा’ असे चित्र दिसत आहे.
दरवर्षीप करंज्या, चकली, चिवडा आणि शंकरपाळ्यांना अधिक मागणी असते, मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याचे विलेपार्ले येथील मंजिरी जोगळेकर यांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या तोंडावर फराळासाठी लागणारे खोबरे, शेंगदाणे, साखर आणि गूळ यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यासोबतच ग्राहक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले असून, पौष्टिक आणि साखरविरहित लाडूंना मागणी वाढत आहे, परंतु अशा पदार्थांसाठी ग्राहकांचा कल ठरावीक महागड्या ब्रँडेड व्यावसायिकांकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. तेलाच्या भावात किलोमागे ४० ते ५० रुपयांची तसेच तूप आणि साखरेचे भाव दसऱ्याच्या सुमारास अचानक वाढल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, यंदा बाजारातील मागणीत सुमारे ३५ ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. ब्लिंकिट, स्विगी आणि झोमॅटो यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना वस्तू तत्काळ उपलब्ध होण्याची सवय लागली आहे. घरगुती पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांची तुलनेने अधिक असलेली किंमत यामुळे ग्राहक बाजारातील स्वस्त पर्यायांना पसंती देत आहेत. करंज्या, चकली आणि शंकरपाळ्यांना तुलनेने मागणी असली, तरी वाढता उत्पादन खर्च आणि घटती मागणी यामुळे घरगुती फराळ व्यावसायिकांचा दिवाळीचा उत्साह कमी झाल्याचे पार्ले येथील व्यावसायिक महेश खांडेकर यांनी सांगितले.

परदेशात पाठवणाऱ्या फराळाच्या मागणीत घट
दरवर्षी आमचा फराळ अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड्स आणि अबुधाबी येथे पाठवला जातो. यंदा मात्र कुरियरच्या पार्सल दरात अचानक वाढ झाली आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाने सीमा शुल्कात (कस्टम ड्युटी) २० डॉलरची वाढ केल्याने परदेशातून मिळणाऱ्या ऑर्डर कमी झाल्या आहेत, असे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून व्यवसायात उतरलेल्या पुण्यातील ‘इंडी इट्स’च्या स्वप्ना विजय अरुण यांनी सांगितले.

दिवाळीच्या फराळावरही ‘मुंढे इफेक्ट’
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कारवाईचा परिणाम आता घरगुती फराळ व्यवसायातही जाणवू लागला आहे. भेसळयुक्त पदार्थांवर होत असलेल्या कारवाईमुळे ग्राहक अन्नपदार्थ कसे तयार केले जातात आणि त्यामध्ये कोणते घटक वापरले जातात, याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. घरगुती फराळ व्यावसायिकांना आपण कोणत्या दर्जाचा कच्चा माल वापरतो आणि पदार्थ कशा पद्धतीने तयार करतो, याची माहिती ग्राहकांना विश्वासाने देता येते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास मदत होत असल्याचे अरुण यांनी सांगितले.

ज्वारी आणि मुगाच्या चकलीला अधिक मागणी असते. वाढत्या महागाईमुळे फराळी पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. तरीही कणकेचे लाडू, सेंद्रिय गुळाचे लाडू आणि करंज्यांना ग्राहकांची पसंती आहे. पुण्यात व्यवसाय असला, तरी सर्वाधिक ग्राहक मुंबईतील आहेत.
– स्वप्ना विजय अरुण, इंडी इट्स

गॅस सिलिंडर आणि मजुरीचे दरही वाढल्याने फराळ तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पदार्थांच्या किमती आपसूकच वाढल्याने ग्राहकांच्या मागणीत घट झाली आहे.
- मंजिरी जोगळेकर, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Latest Marathi News Update : ऊस दराचा प्रश्न पेटला! शेतकरी संघटना आणि विठ्ठल कारखान्याचे समर्थकांकडून महामार्गावर रास्ता रोको

Teacher Recruitment: शिक्षक भरतीची यादी जाहीर, १० हजार पदांसाठी ११,४९३ अर्ज; कुठे कराल चेक?

SCROLL FOR NEXT