मुंबई

फटाक्यांच्या धुराने पादचाऱ्यांची कोंडी

CD

फटाक्यांच्या धुराने पादचाऱ्यांची कोंडी
सीएसएमटी परिसरातील भुयारी मार्गात फटाक्यांची विक्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र फटाक्यांची विक्री सुरू असताना सीएसएमटी स्थानकासमोरील भुयारी मार्गातही फटाक्यांची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, माचीसची कांडी वापरून आवाज करणाऱ्या खेळण्यातील बंदुकींचे विक्रेते भुयारी मार्गातच प्रात्यक्षिके दाखवत आहेत. यामुळे भुयारी मार्गात धूर, प्रदूषण आणि उग्र वास पसरत असून, पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, बंदुकींमधून ठिणग्या उडण्याची शक्यता असल्याने आगीचा धोका निर्माण झाला आहे.

सीएसएमटी स्थानकासमोरील भुयारी मार्गात साधारण आठ ते दहा विक्रेते उघड्यावर बंदुकींची विक्री करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते सतत बंदुकींमध्ये माचीसच्या कांड्या टाकून त्यांचा आवाज करून दाखवत आहेत, मात्र या प्रकारामुळे आधीच कोंदट असलेल्या भुयारी मार्गातील वातावरण अधिकच प्रदूषित होत आहे. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या पादचारी मार्गांपैकी हा एक मार्ग असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधी यंत्रणाही बसवण्यात आली आहे, मात्र त्याच ठिकाणी फटाक्यांची विक्री आणि त्यांची प्रात्यक्षिके सुरू असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या भुयारी मार्गाच्या वरच मुंबई महापालिकेचे मुख्यालय असून, जवळच रेल्वेचे मुख्यालयही आहे. असे असतानाही या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब महापौर रितू तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महापौरांनी दोन वेळा या ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याची घोषणा केली, मात्र अद्याप प्रत्यक्ष पाहणी किंवा ठोस कारवाई झालेली नसल्याने परिस्थिती कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT