मुंबई

ज्येष्ठ नाट्यकर्मी रोहिणी हट्टंगडी यांना यशवंत पुरस्कार

CD

ज्येष्ठ नाट्यकर्मी रोहिणी हट्टंगडी यांना यशवंत पुरस्कार
मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१वा वर्धापन दिन उत्साहात

मुंबई, ता. १ : मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१वा वर्धापन दिन आणि वाचक दिन सोहळा शनिवारी (ता. ३१) डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भालेराव कुटुंबीयांतर्फे देण्यात येणाऱ्या ‘यशवंत पुरस्कारा’ने ज्येष्ठ नाट्यकर्मी रोहिणी हट्टंगडी यांना, तर मंगल विजय केंकरे यांना ‘सहचारिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नाट्यकर्मी रोहिणी हट्टंगडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी साहित्य संघाच्या मुखपत्राच्या ‘साहित्य’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. एकनाथ आव्हाड, प्रा. प्रतिभा बिस्वास आणि चंद्रशेखर गोखले यांनी या अंकाचे संपादन केले आहे. तसेच प्रा. प्रतिभा सराफ संपादित साहित्य संघाच्या ‘मराठी गजल : एक दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात डॉ. मांगीलाल राठोड, मराठी भाषा अभ्यासक डॉ. वीणा सानेकर, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, सुनील तांबे, सुनीला सोवनी, राजीव करडे, सचिन मणेरीकर, देवदत्त परुळेकर, विलास सिंदगीकर आणि अनघा प्रकाशन आदींना विविध साहित्य गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘साहित्य वाचनामुळे माणसाचे मन आणि नातेसंबंध समजून घेण्याची प्रगल्भता निर्माण होते,’ असे मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. प्रशासनात काम करताना माणसांना समजून घेण्याची वृत्ती महत्त्वाची असून, साहित्याच्या वाचनातून ती विकसित होते, असे त्या म्हणाल्या.


साहित्याचाही सकारात्मक परिणाम!
अध्यक्षीय भाषणात रोहिणी हट्टंगडी यांनी नाट्यकलेचा व्यक्तिमत्त्वावर होणारा सकारात्मक परिणाम सांगितला. कस्तुरबांची भूमिका साकारल्यानंतर आपल्यातील क्षमाशील वृत्ती वाढल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. साहित्याचाही माणसावर असाच सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT