संविधान सत्याग्रह पदयात्रा पोलिसांनी रोखली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सत्याग्रह’ पदयात्रा रविवारी (ता. १) पोलिसांनी रोखली. मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारी ही पदयात्रा पोलिसांनी चौकातच रोखली. त्यामुळे सहभागी कार्यकर्त्यांना मंत्रालयापर्यंत जाता आले नाही, या वेळी पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सीएसएमटी परिसराला पोलिस ठाण्याचे स्वरूप आले होते.
‘हम भारत के लोग’ आणि ‘अ वॉक टू डिफेंड अवर डेमॉक्रसी या संकल्पनेतून रविवारी सायंकाळी ४.३० वाजता या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सर फिरोजशहा मेहता पुतळा, हुतात्मा चौक, बाळासाहेब ठाकरे, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत मंत्रालयाजवळ पदयात्रेचा समारोप करण्याचे नियोजन होते. या आंदोलनात सहभागी होणार असलेले सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना सकाळपासूनच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी रोखून ठेवल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, पदयात्रेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी महापालिका मुख्यालयासमोरील चौकातच अडवले. या वेळी आमदार अबू आझमी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि अली भोजानी उपस्थित होते. लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या या पदयात्रेला पोलिसांनी मज्जाव केल्याने नियोजित कार्यक्रम होऊ शकला नाही.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.