मुंबई

पाणीपुरवठा सुधारणा कंत्राटात ३.५८ कोटींची वाढ

CD

पाणीपुरवठा सुधारणा कंत्राटात ३.५८ कोटींची वाढ
गोरेगाव उड्डाणपुलाच्या कामासाठी जलवाहिनी स्थलांतरित करणार; एकूण खर्च ११.७९ कोटींवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. गोरेगाव पूर्वेतील चित्रनगरी रस्त्यावरील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी तसेच बोरिवली पश्चिमेतील गोराई-२ येथील ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या अतिरिक्त कामांमुळे पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पाच्या खर्चात तीन कोटी ५८ लाख २९ हजार ७९४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ११ कोटी ७९ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
पश्चिम उपनगरातील के/पूर्व, के/पश्चिम आणि पी/उत्तर विभागांतील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने विविध व्यासांच्या जलवाहिन्या टाकणे, जुन्या जलवाहिन्या बदलणे आणि उपसा केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी मे. जे. एस. इन्फ्राटेक या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, मूळ कंत्राटाची रक्कम सहा कोटी ७० लाख २७ हजार रुपये होती. १६ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेले हे काम पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, गोरेगाव पूर्वेतील चित्रनगरी रस्त्यावर गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या उतरंडीच्या कामात ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अडथळा ठरत आहे. त्यामुळे पूल विभागाने ही जलवाहिनी तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, बोरीवली पश्चिमेतील गोराई-२ परिसरात रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अडथळा ठरत असल्याने ती बदलणे आवश्यक झाले आहे.

प्रस्ताव स्थायी समितीसमोर
या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविल्यास उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू असलेल्या पाणीपुरवठा सुधारणा कंत्राटातूनच ही अतिरिक्त कामे करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, कंत्राटदाराला द्यावयाची रक्कम नऊ कोटी ६३ लाख ९५ हजार ८६९ रुपयांवर पोहोचली आहे. विविध कर आणि तरतुदींसह महापालिकेचा एकूण खर्च आठ कोटी २० लाख ९६ हजार ७४७ रुपयांवरून ११ कोटी ७९ लाख २६ हजार ५४१ रुपयांपर्यंत वाढला आहे. या वाढीव खर्चाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

Manoj Jarange Patil: ''माझ्याविरोधात महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली'', मनोज जरांगेंचा आणखी एक गौप्यस्फोट

Haribhau Bagde Salary Donation: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा पुढाकार; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

SCROLL FOR NEXT