मुंबई

तीन वर्षांत १,४०० घरे पूर्ण होणार

CD

तीन वर्षांत १,४०० घरे पूर्ण होणार
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल १,४०० घरे उभारली जाणार आहेत. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथ, कल्याण परिसरात सदरची घरे उभारली जात असून, ९५० घरांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे, तर उर्वरित ४५० घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील तीन वर्षांत या सर्व घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना पसंती दिली जात आहे. त्याची दखल घेत कोकण मंडळाकडून अंबरनाथ नजीक कोचकुंटवली येथे ६०० घरांचे काम सुरू केले आहे. शिवगंगा नगर ३५० घरांचे नियोजन असून, त्याच्या आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे. मोरीवली येथे १०२ घरे उभारली जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे, तर कल्याण नजीक घोटेघर येथे ३४८ घरांचे काम सुरू आहे. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सहजपणे घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

२०-२२ लाख रुपये किंमत
म्हाडाकडून पीएमवाय अंतर्गत उभारली जाणारी सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ३२० चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या या घरांची किंमत २०-२२ लाखांच्या घरात असणार आहे. सदर घरे तीन वर्षांत उभारून पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर लाॅटरीच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकाची भरारी! PSI, नायब तहसीलदार ते DySP जिद्दीचा प्रवास; शिवप्रसाद पारवेंची स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी..

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

SCROLL FOR NEXT