मुंबई

दिया मिर्झा हिंदुविरोधी, देशद्रोही ः महापौर

CD

दिया मिर्झा हिंदूविरोधी, देशद्रोही : महापौर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून राजकीय वाद पेटला असताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही या व्हिडिओवर आक्षेप घेतला. ‘‘दिया मिर्झा हिंदूविरोधी, देशद्रोही असून, त्यांनी आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी ते शिकवू नये,’’ या शब्दांत महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
महापौर रितू तावडे यांनी आज पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन, महापालिकेने सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यामार्फत फटाक्यांबाबत जनजागृतीसाठी बनविलेल्या व्हिडिओबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘दिया मिर्झा या हिंदूविरोधी, देशद्रोही असून, त्यांची भूमिका पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेली नाही. त्या नेहमीच हिंदू सणांना लक्ष्य करून त्याविरोधात भूमिका घेतात. आम्ही फटाके वाजवावेत किंवा वाजवू नयेत, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही दिवाळी कशी साजरी करावी, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. वास्तविक दिया मिर्झा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने मांडलेल्या मुद्द्यांना नेहमीच विरोध केला आहे,’’ असे आरोपही महापौरांनी या वेळी केले. याप्रकरणी आपण आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवणार असून, हिंदुत्वविरोधी दिया मिर्झा यांचा व्हिडिओ पालिका प्रशासनाने का पोस्ट केला, असा सवाल करून जाब विचारणार असून, त्याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, दिया मिर्झाला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करणार आहे, असे महापौरांनी सांगितले. दरम्यान, माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे जनजागृतीपर व्हिडिओ मात्र कायम आहेत.
...
मातोश्रीवरून फोन!
दिया मिर्झा यांच्यावर आरोप केल्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर टीका केली. त्यावर बोलताना महापौर तावडे यांनी, ‘माझ्यावर रोज टीका करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरून फोन येतात, त्यांना त्यांचे पद टिकविण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते,’ असे उत्तर दिले.
...
विरोधक आक्रमक
- भाजप नेते अमित साटम यांनी समाजमाध्यमावरून ‘शहाणपण शिकवू नका’ असे म्हटले आहे; मात्र हा सण सर्वांचा आहे. चांगल्या गोष्टीसाठी आवाहन केले, तर तेढ निर्माण करू नये असे वाटते, अशी प्रतिक्रिया उपमहापौर संजय घाडी यांनी दिली.
- विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणावरून भाजप आणि महापौरांवर जोरदार टीका केली. दिया ही देशाची नागरिक असून, पर्यावरणाच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्याचा तिला अधिकार आहे. तिच्या नावावरून किंवा धर्मावरून तिला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
- अमित साटम नेमके कोण आहेत? त्यांचा महापालिकेच्या कारभारात एवढा वावर का आहे, याचे उत्तर महापालिकेने दिले पाहिजे. साटमसारख्या आमदारांना घाबरून जर महापालिका व्हिडिओ हटवणार असेल, तर महापालिकेला टाळेच मारलेले बरे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
- काँग्रेसचे नेते अशरफ आझमी यांनी दिया मिर्झांना लक्ष्य करण्याऐवजी मुंबईच्या ढासळत्या पर्यावरणाचे उत्तर महापालिकेने द्यावे, अशी टीका केली. दिया मिर्झा यांचा व्हिडिओ रिपोस्ट करा; अन्यथा आंदोलन करू असा इशारा आशरफ आझमी यांनी दिला आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी फटाक्यांच्या समर्थनावरून भाजपला लक्ष्य केले.
...
काहीही चुकीचे केलेले नाही ः वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अभिनेत्री दिया मिर्झाच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या संदेशाला पाठिंबा देत भाजपवर टीका केली आहे. दिया मिर्झाने काहीही चुकीचे केलेले नाही. धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असून, यातून विकृत मानसिकता दिसते, असे वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIRचा सर्वाधिक फटका देशातील 'या' मोठ्या राज्याला; तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळली

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Latest Marathi News Live Update : पायल पवार-झांबरे प्रकरणात मोठी अपडेट; पुणे स्वारगेट पोलिस ठाण्यात पती, सासू-सासऱ्यांसह नणंदेवर गुन्हा दाखल

Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

SCROLL FOR NEXT