मुंबई

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

CD

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
‘कोकणकन्या’ चार तासांहून अधिक उशिराने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या विलंबामुळे रविवारी (ता. २) प्रवाशांचे नियोजन विस्कळित झाले. नियमित गाड्यांसोबत विशेष गाड्यांची वर्दळ वाढल्याने एकेरी मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक सांभाळताना अडचणी निर्माण होत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस, जनशताब्दी, कोकणकन्या आणि मुंबई-मंगळुरू अतिजलद एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. दरम्यान, रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या कामाकरिता ब्लॉक घेण्यात आल्याने या गाड्यांना विलंब झाल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस रविवारी (ता. १) मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार होती. मात्र, तिच्या सुटण्याची वेळ बदलून सोमवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आली; तरीही प्रत्यक्षात ही गाडी सकाळी आठ वाजता रवाना झाली. त्यामुळे प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. तर गाडी क्रमांक १२०५१ जनशताब्दी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा एका मिनिटाने उशिरा सुटली. मात्र मडगाव येथे पोहोचताना तिला एक तास १० मिनिटांचा विलंब झाला. मुंबई-मंगळुरू अतिजलद एक्स्प्रेसही नियोजित वेळेत सुटली; मात्र मंगळूर येथे दोन तास २६ मिनिटे उशिराने पोहोचली. गाडी क्रमांक २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेस रविवारी रात्री ११.०२ वाजता सुटणे अपेक्षित होते. तिच्या सुटण्याची वेळ बदलून मध्यरात्री १२.१० वाजता करण्यात आली. प्रत्यक्षात ही गाडी रात्री १२.३१ वाजता रवाना झाली. मडगाव येथे पोहोचताना तिला चार तास ३४ मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे पुढील प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.

रुळांच्या सुरक्षिततेसाठी ब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर रुळांच्या सुरक्षिततेसाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांसाठी नियोजित ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन विलंब झाला, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.

गाड्यांचे मार्ग मर्यादित ठेवण्याची सूचना
सर्व गाड्या मडगावपर्यंत चालविल्याने एकेरी मार्गावरील वाहतुकीवर ताण येत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. काही गाड्या सावंतवाडी किंवा करमळीपर्यंतच चालविल्यास कोकणातील प्रवाशांसाठी अधिक गाड्या उपलब्ध होतील आणि वाहतुकीचे नियोजन सुकर होईल, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच कोकणकन्या एक्स्प्रेसचा अतिजलद दर्जा काढून तिला पुन्हा मेल-एक्स्प्रेस श्रेणीत आणावे आणि मडगाव-मुंबई गाडी पूर्वीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIRचा सर्वाधिक फटका देशातील 'या' मोठ्या राज्याला; तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळली

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

SCROLL FOR NEXT