मुंबई

दिया मिर्झावरून महायुतीत जुंपली

CD

दिया मिर्झावरून महायुतीत जुंपली
व्हिडिओवरून भाजप-शिवसेनेत मतभेद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झा हिचा व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दियाच्या व्हिडिओला आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तो सोशल मीडियावरून हटवला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झावर टीका करीत तिची भूमिका आणि पूर्वीची विधाने यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटाने या भूमिकेला छेद देत दिया मिर्झाची पाठराखण केली. त्यामुळे या प्रकरणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

महापौर रितू तावडे यांनीही या वादात उडी घेत दिया मिर्झावर टीका केली. तसेच साटम यांचे विधान हे मुंबई भाजपच्या नगरसेवकांचीही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिया मिर्झाला भाजप आणि महायुतीशी संबंधित उपक्रमांपासून दूर ठेवण्याची भूमिका तावडे यांनी मांडली. त्यामुळे या वादाला राजकीय वळण मिळाले. दरम्यान, उपमहापौर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांनी भाजपच्या भूमिकेशी असहमती दर्शविली. महापालिकेने हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करावा, अशी मागणी घाडी यांनी केली. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनीही भाजप आणि महापौरांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. दिया मिर्झाने यापूर्वी काय विधाने केली याचा या विषयाशी संबंध नाही. दिवाळीत फटाक्यांबाबत तिने केलेले आवाहन शंभर टक्के योग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महापौर रितू तावडे यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करीत महापौरपदाची जबाबदारी सांभाळणे शक्य नसेल तर खुर्ची खाली करा, शिवसेनेच्या ताब्यात महापौरपद द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेतील व्हिडिओवरून सत्ताधारी पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका पुढे आल्याने महायुतीतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT