मुंबई

मध्यरात्री विजेचा उच्चांक

CD

मध्यरात्री विजेचा उच्चांक
ऑक्टोबर हीटचा परिणाम; उच्चभ्रू वस्त्यांत पहाटेपर्यंत एसीचा वापर, वीज वितरण यंत्रणेवर ताण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : ऑक्टोबर हीटमुळे गेल्या १५ दिवसांत मुंबईत विजेच्‍या मागणीने चार हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत दुपारपासून रात्री १० वाजेपर्यंत विजेची मागणी जास्त नोंदली जाते, मात्र हा ट्रेंड आता हायप्रोफाइल निवासी भागात काहीसा बदलत असून, मध्यरात्री १२ ते पहाटे ३-४ वाजेपर्यंत सर्वाधिक मागणी नोंदली जात आहे. यामध्ये अंधेरी लोखंडवाला, जुहू, गोरेगाव, वांद्रे, पवईसारख्या हाय-प्रोफाइल निवासी वस्त्यांचा समावेश असून, त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरातील फिडरवर ताण येत आहे.
मुंबई शहरात बेस्टकडून तर उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जातो. आतापर्यंत सुमारे ४,६०० मेगावॉट एवढी मुंबईची विजेची सर्वाधिक मागणी नोंदली असून, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर विजेच्या वापराचा ट्रेंड बदलत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सकाळी आणि सायंकाळी विजेच्या मागणीचा उच्चांक गाठला जात होता, मात्र आता अनेक भागांत मध्यरात्री विजेची सर्वाधिक मागणी नोंदवली जात आहे. विशेषतः अंधेरी लोखंडवाला, जुहू, गोरेगाव, वांद्रे, पवईसारख्या हायप्रोफाइल आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढते तापमान, दमट हवामान आणि रात्री घरात थंडावा राखण्याच्या सवयीमुळे एसीचा जास्त वापर होतो. त्याशिवाय चार्जिंगची वाहने, चार्जिंगची उपकरणे रात्रभर चार्ज केली जात असल्याने हा बदल घडत आहे.

देखभालीचे नियोजन बदलावे लागते
वीज मागणीच्या या बदलत्या ट्रेंडमुळे वीज कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी देखभालीची कामे करणे अवघड होते आणि त्याच वेळी मागणी जास्त असल्याने नियोजन बदलावे लागत आहे. भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अंधेरी, जुहू, गोरेगाव यासारख्या उच्चभ्रू वस्तीतील लोक रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर मोठ्या प्रमाणात एसीचा वापर करत असून, पहाटेपर्यंत चालतो. त्यामुळे या बदलत्या ट्रेंडची दखल घेऊन वीज कंपन्यांना आपली यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे.
- डॉ. अशोक पेंडसे, वीजतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT