मुंबई

सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी

CD

सार्वजनिक आरोग्यसेवेला बळकटी
१,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना आज मिळणार नियुक्ती आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील एक हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष कार्यक्रम बुधवारी (ता. ४) आयोजित केला आहे.

६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मोठे मनुष्यबळ मिळणार असून, शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे. राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता वाढविणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून गंभीर आजारांपर्यंतच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही भरती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण दोन हजार ५१४ पदांपैकी एक हजार ४४० पदांसाठी २७ फेब्रुवारी २०२६ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अशा एकूण एक हजार ४४० पदांचा समावेश आहे.

विशेषज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत विविध विशेषज्ञ उपचार सेवा उपलब्ध करून देण्यास बळ मिळेल. तर एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर शासकीय आरोग्य संस्थांमधील नियमित रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा
शासनाच्या या नियुक्त्यांचा सर्वाधिक फायदा ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT