सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : दिवाळीच्या काळातच सुरू झालेल्या मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटनानंतर नियमित सेवेला सुरुवात होताच या गाडीच्या आरक्षणासाठी प्रवाशांची पसंती मिळू लागली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महागडे म्हणजेच ४,४५० रुपये तिकीटदर असलेल्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही अनेक दिवसांसाठी फुल्ल झाले आहे. नोव्हेंबरमधील काही दिवस प्रथम श्रेणीचे आरक्षण ‘रिग्रेट’ स्थितीत पोहोचले असून, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतही प्रतीक्षा यादी शंभरीपार गेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीतील प्रवासासाठी नव्या वंदे भारत स्लीपरचे आकर्षण वाढल्याचे चित्र आहे.
४ नोव्हेंबरच्या प्रवासासाठी प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी १९, द्वितीय श्रेणीची ४६, तर तृतीय श्रेणीची १०४ आहे. ५ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीचे आरक्षण ‘रिग्रेट’ झाले असून, द्वितीय आणि तृतीय श्रेणीची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ६१ आणि १११ आहे. ६ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी ३०, द्वितीय श्रेणीची ८७, तर तृतीय श्रेणीची १६८ वर पोहोचली आहे.
प्रथम श्रेणीचे आरक्षण ‘रिग्रेट’
७ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीचे आरक्षण पुन्हा ‘रिग्रेट’ झाले आहे. या दिवशी द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी ५१, तर तृतीय श्रेणीची ९८ आहे. ८ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी १७, द्वितीय श्रेणीची ४० आणि तृतीय श्रेणीची ६१ आहे. ९ आणि ११ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीचे आरक्षण पुन्हा ‘रिग्रेट’ स्थितीत गेले आहे. या दोन्ही दिवशी द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ८२ आणि ७३, तर तृतीय श्रेणीची १२६ आणि ११४ आहे.
ग्राफिक्स
प्रतीक्षा यादीतील स्थिती
प्रवासाची तारीख - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - तृतीय श्रेणी
२ नोव्हेंबर - १०० टक्के आरक्षण
४ नोव्हेंबर - १९ - ४६ - १०४
५ नोव्हेंबर - रिग्रेट - ६१ - १११
६ नोव्हेंबर - ३० - ८७ - १६८
७ नोव्हेंबर - रिग्रेट - ५१ - ९८
८ नोव्हेंबर - १७ - ४० - ६१
९ नोव्हेंबर - रिग्रेट - ८२ - १२६
११ नोव्हेंबर - रिग्रेट - ७३ - ११४
तिकीटदर
प्रथम श्रेणी वातानुकूलित - ४,४५० रुपये
द्वितीय श्रेणी वातानुकूलित - ३,६३० रुपये
तृतीय श्रेणी वातानुकूलित - २,८१० रुपये
गाडीची वैशिष्ट्ये
- एकूण डबे - १६
- एकूण बर्थ - ८२३
- धावण्याचे दिवस - मंगळवार वगळता आठवड्यातील सहा दिवस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.