मुंबई

सणासुदीच्या गर्दीवर ‘उधना’चा उतारा

CD

सणासुदीच्या गर्दीवर ‘उधना’चा उतारा
२५ ते ३० हजार प्रवाशांची व्यवस्था; प्रवासी केंद्रावर ४० कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने गुजरातमधील उधना स्थानकावर स्वतंत्र प्रवासी सुविधा केंद्र उभारले आहे. सुमारे ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या केंद्रामुळे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकाच वेळी २५ ते ३० हजार प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या केंद्राचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ३१) करण्यात आले.

अर्धा किलोमीटर लांब आणि ३६ मीटर रुंद परिसरात मिनी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर हे केंद्र उभारण्यात आले आहे. दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा हाताळण्याची त्याची क्षमता आहे. पहिल्याच रात्री येथे ३० हजारांहून अधिक प्रवासी आले. रेल्वे विकास निगमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रवाशांना थेट फलाटावर जाण्याऐवजी या केंद्रात थांबवून गाडीच्या वेळेनुसार टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे गाडी येण्यापूर्वी फलाटांवर होणारी गर्दी नियंत्रित करता येईल. केंद्रात १० हजार चौरस मीटरचा आच्छादित प्रतीक्षा परिसर, दोन हजार चौरस मीटरचा प्रवेश प्लाझा आणि तीन हजार चौरस मीटरचा मोकळा मार्ग तयार करण्यात आला आहे.’ या केंद्रात विनाआरक्षित तिकिटांसाठी १० खिडक्या, स्वतंत्र स्वच्छतागृहे, लहान मुलांना दूध पाजण्यासाठी कक्ष आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीट काढण्यापूर्वीचा परिसर, तिकीट व्यवस्था आणि तिकीट काढल्यानंतरचा परिसर असे तीन विभाग आहेत.

राज्यातील प्रवाशांना फायदा
सुरत आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांत महाराष्ट्रातील अनेक नागरिक रोजगार व व्यवसायानिमित्त राहतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. विरार शटल, भुसावळ एक्स्प्रेस, अमरावती विशेष आणि नंदुरबार एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांमधून या प्रवाशांची वाहतूक होते. गर्दीच्या काळात विशेष गाड्याही चालवल्या जातात. त्यामुळे उधना येथील नव्या केंद्राचा लाभ महाराष्ट्रातील प्रवाशांना होणार आहे.


सुरत हे हिरे आणि कापड उद्योगाचे मोठे केंद्र असल्याने दिवाळी, छठपूजा आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी २० ते ३० टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे उधना स्थानकाचा पर्यायी स्थानक म्हणून विकास करण्यात आला आहे. केंद्र सुरू झाल्यानंतर पहिल्याच रात्री ३० हजारांहून अधिक प्रवासी आले, मात्र नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT