दिवाळीपूर्वी मुंबईकरांना मोठी भेट
बेस्टच्या ताफ्यात ४८ नव्या ई-बस दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईकरांचा बसप्रवास अधिक सुखकर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४८ नव्या वातानुकूलित ई-बसचा समावेश करण्यात आला. दिवाळीपूर्वी मुंबईकरांना ही भेट देण्यात आली. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३) मागाठणे आगारात या बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
सुमारे १२ मीटर लांबीच्या या बसगाड्या ‘ओलेक्ट्रा’ आणि ‘ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि.’ या कंपनीकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कंपनीला अशा प्रकारच्या २,४०० ई-बस खरेदीचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी ५० बसगाड्यांचा पुरवठा झाला असून, आता नव्या ४८ बसगाड्यांसह आतापर्यंत ९८ बसगाड्या दाखल झाल्या आहेत.
----
कोणत्या मार्गांवर धावणार?
नव्या बसगाड्या मागाठणे आगारातून पाच मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. कांदिवली पूर्व, संघर्षनगर (चांदिवली), समतानगर आणि मागाठणे येथून त्यांचे परिचालन होईल. या मार्गांद्वारे बोरिवली पूर्व, ठाणे पूर्व आणि मिरा रोड पूर्व रेल्वे स्थानकांपर्यंत त्या धावणार आहे. ई-बसगाड्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत तसेच अन्य खरेदी आदेशांनुसार आणखी दोन हजार बसगाड्या लवकरच बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
.......
नव्या बसगाड्यांचे वैशिष्ट्ये
नव्या बसगाड्यांमध्ये ४१ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, रुंद प्रवेशद्वार आणि जलद चार्जिंगची सुविधा आहे. बॅटरीचे वजन १६ टक्क्यांनी कमी असून, ती बसच्या छताऐवजी तळाशी बसवली आहे. सीसीएस-२ तंत्रज्ञानामुळे बॅटरी ५८ टक्के अधिक वेगाने चार्ज होणार आहे. तसेच एबीएस ब्रेकिंग प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस आणि आपत्कालीन पॅनिक बटण यासारख्या सुविधा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.