मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक निष्फळ

CD

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक निष्फळ
कर्मचारी संघटनाचा राज्यभरात आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत मंगळवारी (ता. ३) प्रशासनाची कर्मचारी संघटनासोबतची झालेली बैठक निष्फळ ठरली. निधी अभावी देणी देण्यास अडचण येत असल्याचे सांगत एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी हातवर केल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनानी दिली.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, ‘गेल्या बारा महिन्यांपासून वेतनासाठीच १,३३८.१५ कोटींची तूट असताना पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यासारखे लाभ कसे मिळणार आहे, या आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दीर्घकालीन संपावेळी त्रिसदस्यीय समितीसमोर शासनाने निधी देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली नसल्याने महामंडळाने शासनाविरोधात अवमान याचिका दाखल करावी, अशी ठाम मागणी आम्ही केली आहे. केवळ दर महिन्याला पत्र पाठवून प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न व्यवस्थापकीय संचालकांच्या स्तरावर सुटणारा नाही. मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अर्थमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवावेत, अन्यथा एसटीमध्ये पुन्हा आंदोलन अटळ आहे.’ या बैठकीत एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी येत्या ६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.


आंदोलन सुरू
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व अन्य न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राज्यभर तीन टप्प्यांमध्ये तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारपासून झाली असून, राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भव्य घंटानाद, तीव्र निदर्शने व द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

SCROLL FOR NEXT