मुंबई

धूळ पसरवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दंड

CD

धूळ पसरवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दंड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पवईतील आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील बांधकामस्थळावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने कारवाई केली. एस विभाग कार्यालयाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. त्यामध्ये बांधकामस्थळावरून धुळीचे मोठे लोट उठून परिसरात पसरत असल्याचे दिसत होते. धूळ नियंत्रणासाठी पालिकेने निश्चित केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दाही या पोस्टमधून उपस्थित करण्यात आला होता. या प्रकाराची दखल घेत एस विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ३) बांधकामस्थळाची पाहणी केली. हे बांधकाम ध्यानकुंज इमारतीचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायुप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, बांधकामस्थळांभोवती आच्छादन, पाण्याची फवारणी आणि धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याने बांधकामस्थळांवरील देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

Tukaram Mundhe: ''तुम्हाला चांगलं अन्न नकोय का?'' असं का म्हणाले तुकाराम मुंढे? मंत्र्यांना मुंढे का नकोसे वाटतात? दिलं उत्तर...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

SCROLL FOR NEXT