इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ
मुंबई, ता. ४ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता. ४) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोय व्हावी यासाठी ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी मुला आणि मुलीसाठी ७२ वसतिगृहे आहेत. सध्या विभागीय स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहाशे रुपये देण्यात येतात. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आता विभागीय स्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये तर जिल्हा स्तरावर १,३०० रुपये निर्वाह भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबत आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अकरा हजार रुपये निर्वाह भत्ता आता तो अठरा हजार रुपये होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.