मुंबई

कर्करोगाविरुद्ध जनजागृतीचा नवा प्रयोग

CD

मुंबई, ता. ५ : कर्करोगाविषयी समाजातील भीती आणि गैरसमज दूर करून वेळीच तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारतीय कर्करोग संस्थेने अभिनव जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, कर्करोगाचे लवकर निदान आणि धूम्रपानमुक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी ‘मुँह दिखाई’ हा विशेष लघुपट तसेच धूम्रपान सोडण्याची आठवण करून देणारी विशेष दुहेरी अंगठी सादर करण्यात आली आहे.

कर्करोग म्हटले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, मात्र तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांचे वेळीच निदान झाल्यास यशस्वी उपचार शक्य आहेत. तरीही भीती आणि गैरसमजांमुळे अनेक जण तपासणी टाळतात किंवा उशिरा डॉक्टरांकडे जातात. ही मानसिकता बदलून नियमित आरोग्य तपासणीसोबत कर्करोगाची तपासणी करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे या कार्यक्रमाचे प्रमुख माधव नेने यांनी सांगितले.

तंबाखू सेवन आणि कर्करोग यांचा जवळचा संबंध लक्षात घेऊन ‘मुँह दिखाई’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे. नेहमीच्या भीतीदायक चित्रणाऐवजी दैनंदिन जीवनातील प्रसंगांच्या माध्यमातून तंबाखूचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनाचे महत्त्व यातून मांडण्यात आले आहे. विविध प्रसारमाध्यमांद्वारे हा लघुपट टप्प्याटप्प्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे
कर्करोगाची भीती दूर करणे, नियमित तपासणीसाठी प्रोत्साहन देणे आणि तंबाखू व धूम्रपानापासून दूर राहण्याची सकारात्मक मानसिकता निर्माण करणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा त्याचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक महत्त्वाचे आहेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : नागपुरात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' रॅली

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT