मुंबई

सीईटीतील निविदाप्रक्रिया प्रचलित नियमानुसार!

CD

सीईटीतील निविदा प्रक्रिया
प्रचलित नियमानुसार!
सीईटी कक्षाचे स्पष्टीकरण
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेचे काम करण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया शासनाच्या प्रचलित नियमानुसार राबवण्यात आली. प्रवेश प्रक्रियेच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावर सीईटी कक्षाने हे स्पष्टीकरण दिले.
सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेचे काम करणाऱ्या खासगी संस्थेच्या कंत्राटामध्ये २,३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर सीईटी कक्षाने खुलासा केला. निविदा-संबंधित आरोपांबाबत, सीईटी कक्षाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पवार यांना तसेच सरकारला कागदोपत्री पुरावे आणि सविस्तर लेखी उत्तर सादर केले होते. सर्व निविदा प्रक्रिया शासनाच्या प्रचलित नियमानुसार झालेली आहे. कुणाकडे याबाबत आणखी पुरावे असल्यास त्यांनी ते सीईटी कक्षाकडे सादर करावेत. त्याची सत्यता तपासून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. वरील आरोपांबाबत सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला सर्व पुरावे दिले आहेत, तसेच त्यांच्या तपासात सहकार्यही केले जात आहेत. त्यामुळे आमदार पवार यांनी केलेले वस्तुस्थितीला धरून नाही, असे स्पष्टीकरण सीईटी कक्षाने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Latest Marathi News Live Update : शरद पवार मुंबईतील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

SCROLL FOR NEXT