मुंबई

मिठी नदी गैरव्‍यवहार झालाच नव्हता!

CD

मिठी नदी गैरव्‍यवहार झालाच नव्हता!
काँग्रेसचा दावा; ठाकरेंची शिवसेना गप्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मिठी नदीतील गाळउपसा आणि सफाईच्या कामातील कथित ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यावरून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत बुधवारी राजकीय खडाजंगी झाली. या गैरव्‍यवहाराशी संबंधित कंपनीला पुन्हा निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात असेल, तर मग यापूर्वी ६५ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप कशाच्या आधारावर करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केला. तसेच तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावाही त्यांनी केला.

कथित गैरव्यवहाराशी संबंधित कंपनीसह दोन कंपन्यांना निविदा प्रक्रियेत पात्र ठरविण्यात आल्याने माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि आझमी यांनी प्रशासनाला जाब विचारला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते का, असा सवाल सदस्यांनी केला. त्यावर संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नसून, निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्याबाबत विधी विभागाचा सल्ला घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मुद्द्यावरून काॅँग्रेस आक्रमक झाली असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मौन बाळगल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT