मुंबई

मुंबईत पाच अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित

CD

मुंबईत पाच अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित
मुंबई, ता. ४ : सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत झेप्टो, आयटीसी लिमिटेडसह पाच अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांचे उत्पादन, अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळले आहे. दरम्यान, दहिसर येथील एका मिठाई आणि फरसाण विक्रेत्याकडून २१४ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एफडीएच्या पथकांनी मंगळवारी (ता.३) मुंबईसह राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली.

मुंबईत दादर पश्चिम येथील मे. शीतल्स, अंधेरी पूर्व येथील आयटीसी लिमिटेड, मुलुंड येथील मे. धान्य एंटरप्रायझेस (गुप्ता शेव अँड पुरी), कांदिवली पूर्व येथील मे. झेप्टो लिमिटेड आणि बोरिवली येथील मे. भगवती स्टोअर्स या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. दरम्यान, दहिसर पूर्व येथील मे. जडेश्वर स्वीट अँड फरसाण या आस्थापनेवर कारवाई करताना २१४ किलो बुंदी आणि स्वीट हलवा जप्त करण्यात आला. दुसरीकडे मंगळवारी राज्यातील कारवाईत १८ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, चार आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान सुमारे ३७.५० लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १६.८७ लाख रुपयांचा साठा जप्त करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.


...
खाद्यतेल विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी
एफडीएच्या पथकांनी मंगळवारी (ता. ३) पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांत मिठाई उत्पादक, सुकामेवा विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ, फरसाण, मसाले आणि खाद्यतेल विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि लेबलिंगमधील त्रुटी आढळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT