मुंबई

मुंबई हौसिंग फेडरेशनवर ‘सहकार’चे निर्विवाद वर्चस्व

CD

मुंबई, ता. ५ : मुंबई हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने, ‘सहकार पॅनेल’ने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबई हौसिंग फेडरेशनची निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक आ. प्रसाद लाड, नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. या निवडणुकीत फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून अजय बागल, हेमंत दळवी, प्रकाश दरेकर, शाम दरेकर, मुकेश घुमरे, आशीष गोयल, ज्ञानेश्वर महाजन, विशाल कडणे, आनंद माईंगडे, विजय पवार, व्यंकटेश सामंत, विष्णू सावळ, यशवंत सावंत, विजय शेलार, वसंत शिंदे, दत्तात्रय वडेर विजयी झाले. तर महिला राखीव मतदारसंघातून ॲड. शुभांगी सारंग, सविता झेंडे, अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून प्रमोद तायडे, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून सुहास आडिवरेकर आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीव व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून ज्ञानेश्वर गोसावी हे एकूण २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT