मुंबई

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी ‘पीएचडी’ अनिवार्य नाही!

CD

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी ‘पीएचडी’ अनिवार्य नाही!
नेट, सेट, एसईएलटी हीच किमान पात्रता; ‘उच्च शिक्षण’चे स्पष्टीकरण
मुंबई, ता. ४ : राज्यातील विद्यापीठे आणि सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या थेट भरतीसाठी पीएचडी अनिवार्य नाही. राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) किंवा राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (एसईएलटी) हीच किमान पात्रता असल्याचे स्पष्टीकरण आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहे. त्यामुळे प्राध्यापक पदभरतीच्या किमान शैक्षणिक पात्रतेवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेनुसार, विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापकपदाच्या थेट भरतीसाठी १ जुलै २०२१ पासून पीएचडी पदवी अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनानेही संबंधित शासन निर्णयात आवश्यक तरतूद केली होती; मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने ३० जून २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट, एसईएलटी ही किमान पात्रता निश्चित केली. या अधिसूचनेतील सुधारणांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने शासन निर्णय निर्गमित केला. तथापि नव्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांकाचा उल्लेख आणि मूळ शासन निर्णयातील तरतुदींबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले.
---
नव्या नियमाने भरती करा!
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या स्पष्टीकरणानुसार, ४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे केलेली सुधारणा ही ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट, एसइएलटी ही किमान शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नुसारच राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सहाय्यक प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया राबवावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT