मुंबई

सभागृहाच्या बांधकामाला तांत्रिक अडथळा!

CD

सभागृहाच्या बांधकामाला तांत्रिक अडथळा!

पालिका प्रशासनाचा प्रस्ताव मागे; सुधारित प्रस्ताव सादर होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पालिकेच्या नगरसेवकांसाठी आझाद मैदान परिसरात जुन्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मागे घेतला आहे. प्रस्तावित नव्या सभागृहाच्या बांधकामाच्या मार्गात तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. टाऊन हॉल आणि जिमखान्यासह ३२० नगरसेवकांच्या आसनक्षमतेचे भव्य सभागृह उभारण्यात येणार हाेते. याबाबत स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात अधिनियमातील कलमाचा संदर्भ चुकीचा असल्याचे निदर्शनास आल्याने दुरुस्ती करून ताे पुन्हा नव्‍याने सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या सभागृहाच्या बांधकामाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

प्रशासनाने टाऊन हॉल आणि जिमखान्याचा विकास करण्याचा प्रस्ताव एप्रिल २०२६ मध्ये सादर केला होता. सध्याचे महापालिका सभागृह नगरसेवकांच्या संख्येच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने याच वास्तूमध्ये नवीन सभागृह उभारण्याची मागणी सभागृह नेत्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. त्यानुसार मूळ प्रस्ताव परत पाठवून सभागृहाचा समावेश असलेला सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित आराखडा तयार करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवली. या आराखड्यात सांस्कृतिक दालन, वाहनतळ, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा आणि इनडोअर खेळांसाठी जागेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने व कार्यालये, ३२० नगरसेवक बसू शकतील, असे प्रशस्त सभागृह आणि पत्रकार कक्षाचाही समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तावित इमारतीत दोन तळघर, तळमजला आणि त्यावरील चार मजले, पाचव्या मजल्याचा काही भाग, व्ह्यूइंग गॅलरी तसेच टेरेसवर काचेचा घुमट उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय कार लिफ्ट, कॅप्सूल लिफ्ट आणि स्टॅक पार्किंगसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT