मुंबई

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

CD

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
१० हजारांचे सानुग्रह अनुदान; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, तो ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ही घोषणा केली. एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करीत असतानाही कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी आंदोलन किंवा संपाचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन त्यांनी केले. एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यास शासन आणि महामंडळ तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- - - - -
एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. महामंडळावर आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
- - - - - -
एसटीची आर्थिक स्थिती पाहता थकीत देणी, उत्सव अग्रिम आणि थकीत महागाई भत्ता देणे कठीण होते. तरीही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला. दिवाळी भेटीच्या रकमेत ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करतो.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Latest Marathi News Live Update : घातक हत्यारे जवळ बाळगून फिरणाऱ्या दोघांना अटक

SCROLL FOR NEXT