निवासी डाॅक्टरांना हवे
३० हजारांचे विद्यावेतन
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तुटपुंजा माेबदला
मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील आंतरवासित डॉक्टरांचे विद्यावेतन ३० हजार रुपये करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालक आणि महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत डॉक्टरांच्या आर्थिक हिताचा तसेच कायदेशीर तरतुदींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासनानेही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन दिवाळीनंतर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
वैद्यकीय शिक्षणात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात रुग्णसेवेचा महत्त्वाचा भार सांभाळणाऱ्या एमबीबीएस आंतरवासित डॉक्टरांच्या विद्यावेतनाबाबत दुजाभावाचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये ४४ हजार, ओडिशामध्ये ४० हजार, तर उत्तर प्रदेशात २५ हजार रुपये मासिक विद्यावेतन दिले जात असताना महाराष्ट्रातील डॉक्टरांना केवळ १८ हजार रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. रुग्णसेवेची जबाबदारी आणि कामाचे स्वरूप जवळपास समान असतानाही विद्यावेतनात एवढी मोठी तफावत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ३० हजार रुपये विद्यावेतनासंदर्भात झालेल्या बैठकीत मुंबईतील मेडिव्हिजनचे संयोजक डॉ. विजय गिरी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई संघटनमंत्री ॲड. अमित पटले, सचिव अभिषेक पवार आणि विविध वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांतील आंतरवासितांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दरम्यान, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या (अस्मी) प्रतिनिधींनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन राज्यातील आंतरवासितांचे विद्यावेतन २५ हजार रुपये करण्याची मागणी केली. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याबाबत मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.