मुंबई

दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित

CD

दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित
भांडुप विषबाधेप्रकरणी एफडीएची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : भांडुप लग्नसमारंभात जेवणातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या दोन विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याकडील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेबाबत माहिती देताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, संबंधित लग्नसमारंभासाठी सुरुवातीला सुमारे ४०० पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित राहिल्याने जेवणाची मागणी वाढली. यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि मुख्य खाद्यपदार्थ पुरवठादार यांच्यात अतिरिक्त जेवणाच्या व्यवस्थेवरून वाद झाला. अधिक पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने गुलाबजाम आणि कलाकंद यांसारखे गोड पदार्थ दुसऱ्या विक्रेत्यांकडून मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही विक्रेत्यांकडून पुरवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. संबंधित दोन्ही विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
...
पूर्वसूचना नव्हती
लग्नसमारंभाच्या आयोजकांकडून अन्न व औषध प्रशासनाला कार्यक्रमाची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. नियमानुसार अशा मोठ्या कार्यक्रमांची माहिती प्रशासनाला आधी देणे आवश्यक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT