मुंबई

एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदन द्या

CD

चौकशी आयोगाकडून प्रतिज्ञापत्राचे नमुना प्रारूप उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नियुक्त आयोगाने निवेदन सादर करण्यासाठी प्रतिज्ञापत्राचे नमुना प्रारूप उपलब्ध करून दिले आहे. संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्ती आणि नोंदणीकृत संस्थांना या प्रारूपाचा वापर करून १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदन सादर करता येणार आहे.

निवेदन सादर करण्यासाठी संबंधितांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत निवेदन तयार करून ते नोटरीकृत प्रतिज्ञापत्रासह सादर करावे. त्यासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या ई-मेलवरही पाठवावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या चौकशी आयोगाचे कार्यालय वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) अन्न व औषध प्रशासन भवनाच्या दुसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक २०१ येथे सुरू करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार ही निवेदने मागविण्यात आली आहेत. संबंधितांनी आपली निवेदने complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावीत. तसेच दालन क्रमांक २०१, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारेही निवेदन सादर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री, अभिनेत्यासह तिघांना अटक; आधी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर...

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT