पनवेल-वसईदरम्यान लोकल सेवा
केंद्र सरकारकडे प्रस्ताव; १२ हजार कोटी खर्च
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पनवेल-वसई उपनगरी रेल्वे कॉरिडॉरच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. सुमारे ६९.२३ किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी १२ हजार ७१० कोटी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी-३ बी) अंतर्गत हा कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर १७ स्थानके असणार असून, महामार्ग आणि खाड्यांमुळे निर्माण होणारे अडथळे लक्षात घेऊन सुमारे २८ किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपात उभारण्यात येणार आहे. दरम्यान, पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील रेल्वे जाळ्याचा विस्तार होत असताना आता नव्या मार्गिकेच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.
सध्या पनवेलहून वसई-विरार परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना थेट उपनगरी लोकलची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कुर्ला, दादर किंवा अन्य स्थानकांवर लोकल बदलून प्रवास करावा लागतो. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे पनवेल आणि वसईदरम्यान थेट उपनगरी रेल्वे संपर्क निर्माण होण्यास मदत होईल. परिणामी, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या वाढवण बंदराच्या दृष्टीनेही हा रेल्वे कॉरिडॉर प्रादेशिक दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. महाराष्ट्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने यापूर्वी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. आता १२ हजार ७१० कोटी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या पुढील प्रशासकीय व आर्थिक मंजुरीनंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
...
पनवेल-वसई उपनगरी रेल्वे कॉरिडॉर हा मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
- विलास एस. वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.