मुंबई

मुलींसाठी कराटे प्रशिक्षण तातडीने राबवा!

CD

मुंबई, ता. ११ : शासकीय तंत्रनिकेतन, वांद्रे येथील विद्यार्थिनीची मुंबईतील चर्नी रोड परिसरातील वसतिगृहात निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींना स्वसंरक्षणासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील विद्यापीठांनी तसेच उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये तिसरे महिला धोरण जाहीर केले होते. या धोरणातील मुद्दा क्रमांक ६.१३ नुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी किमान एकदा तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी परिपत्रकही जारी केले होते, मात्र परिपत्रक जारी होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटत असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची बाब समोर आली होती.


शालेय शिक्षण विभागात स्वतंत्र योजना
मुलींच्या सुरक्षिततेसाठी केवळ नियम आणि परिपत्रके पुरेशी नसून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्यात आत्मविश्वास आणि संकटाचा सामना करण्याची क्षमता निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी या निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

SCROLL FOR NEXT