मुंबई

मध्य रेल्वेचा अमृतमहोत्सवी प्रवास

CD

मुंबई, ता. ८ : मध्य रेल्वेने गुरुवारी (ता. ५) स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील ऐतिहासिक वारसा इमारतीत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. या माध्यमातून मध्य रेल्वेचा समृद्ध इतिहास, वास्तुकलेचा वारसा आणि भारतीय रेल्वेच्या विकासातील योगदान अधोरेखित करण्यात आले.

मध्य रेल्वेची स्थापना ५ नोव्हेंबर १९५१ मध्ये झाली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला (जीआयपी) रेल्वेचे निजाम स्टेट रेल्वे, सिंधिया स्टेट रेल्वे आणि धौलपूर स्टेट रेल्वे यांच्याशी विलीनीकरण करून मध्य रेल्वेची निर्मिती करण्यात आली. या प्रवासाची सुरुवात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेल्या देशातील पहिल्या प्रवासी रेल्वेने झाली होती.

उपनगरी सेवांचा विस्तार
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांची संख्या १९५१ मध्ये ५१९ होती. २०२३ मध्ये ती मुंबई आणि पुणे मिळून १,८६० वर पोहोचली. यामध्ये मुंबईतील १,८२० आणि पुण्यातील ४० सेवांचा समावेश होता. मध्य रेल्वेकडून मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गासह पुणे-लोणावळा विभागात उपनगरीय सेवा चालवल्या जातात. नऊ, १२ आणि १५ डब्यांच्या लोकलसह वातानुकूलित सेवांचाही विस्तार करण्यात आला आहे.

विकासकामांना गती
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेने १०३.५८ किलोमीटरचे रेल्वे मार्ग कार्यान्वित केले. यामध्ये ७१.८४ किलोमीटर दुहेरीकरण आणि ३१.७४ किलोमीटर नवीन मार्गांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण १,१५७.१५ किलोमीटरचे रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्थानकांचा पुनर्विकास, लिफ्ट, सरकते जिने आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

Gokul Controversy: '२०२९मध्ये राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातूनच होणार!' सतेज पाटलांनी भाषणात मुश्रीफांना धू-धू धुतलं

मध्य प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! एर्टिगा अन् ट्रकची एकमेकांना जोरदार धडक; ४ जागीच ठार, ६ जखमी

Maharashtra Live News: मुंबईत फटाक्यांमुळे वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 'रॉकेट' उडवण्यावर बंदी; महानगरपालिका आयुक्तांचे कडक निर्देश

मला स्वर्गात जायचंय, नरकात जाणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान चर्चेत, पण असं का म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT