मुंबई

स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देणार!

CD

स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देणार!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवानिवासस्थानांचे चावी वितरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काचे घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कुलाब्यातील पंचशील नगर येथे आश्रय योजना कक्ष टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थान चावी वितरण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मीकी गृहनिर्माण या दोन योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता सुरू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याचा मुलगा त्यांच्या जागी लागल्यानंतर हे निवासस्थान त्याला हस्तांतरित होते. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंचशील नगर येथील १४० सदनिकांचे चावी वितरण करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांना चावी देण्यात आली. यामध्ये भारती धोत्रे, सचिन सोलंकी, वंदना गोरेगावकर, श्यामसिंग वाल्मिकी, प्रशांत सावंत आणि सतीश मार्चंडे यांचा समावेश आहे.
प्री फॅब तंत्रज्ञानामध्ये आतापर्यंत केवळ मोठ्या खासगी इमारती तयार व्हायच्या. पहिल्यांदा महापालिकेची इमारत या तंत्रज्ञानावर आधारित बनविण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शिक्षण अर्हता प्राप्त करणाऱ्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने न्यायालयीन लढा जिंकत लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटी, रोजंदारी, ऐवजदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन आणि त्यांच्या सोयीसुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
...
मुंबईचे खरे हीरो!
मुंबई गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे मुंबईचा खरा हीरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘प्री-फॅब्रिकेटेड’ तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून ही घरे जलद गतीने उभारली आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
...
स्वप्नपूर्तीला सुरुवात!
मुंबईतील २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात पंचशील नगरातील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे. मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांना सन्मानपूर्वक निवास देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
...
योजनांवर दृष्टिक्षेप
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आश्रय योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत ३० वसाहतींचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधून पुनर्विकास करण्यात येत आहे. यामध्ये ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची ११ हजार ३७१ आणि ६०० चौरस फुटांची ७७३ घरे अशी एकूण १२ हजार १४४ घरे देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT