मुंबई

‘सीईटी’ कथित गैरप्रकाराच्या ध्वनिफितीची पोलिसांत तक्रार

CD

‘सीईटी’ कथित गैरप्रकाराच्या ध्वनिफितीची पोलिसांत तक्रार

मुंबई, ता. ६ : सीईटी परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफितीविरोधात सीईटी कक्षाने आझाद मैदान पोलिस ठाण्यात नुकतीच लेखी तक्रार दाखल केली आहे.

सीईटी कक्षाकडे याप्रकरणी एका कथित ध्वनी, व्‍हिडिओ चित्रफितीची तक्रार प्राप्त झाली होती, या व्हिडिओमधील संभाषणामध्ये एका महिलेने दूरध्वनीद्वारे एका पुरुषाशी संभाषण करताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी सीईटी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच संबंधित उमेदवाराचे गुण वाढवून देण्याबाबत कथित आश्वासन दिल्याचे प्रथमदर्शनी संभाषणातून निदर्शनास येते. यामध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही उमेदवाराकडून अथवा संबंधित व्यक्तीकडून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. असे असले तरी, प्राप्त व्हिडिओमधील संभाषणाचे गांभीर्य लक्षात घेता, या संभाषणाची सत्यता पडताळणे तसेच कथित गैरप्रकारामागील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. या तक्रारीसोबत संबंधित संभाषणाचा पेनड्राइव्ह आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर करण्यात आला आहे. दरम्यान, सीईटी कक्षाने समाजमाध्यमासह इतर माध्यमातून चुकीची, दिशाभूल किंवा अपूर्ण माहिती प्रसारित केली जात असल्याचे सीईटी कक्षाच्या निदर्शनास आल्याने, या माहितीची पडताळणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

MBBS Admission: लाखो इच्छुक तरी एमबीबीएसच्या जागा रिक्त का? नीट उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे का स्वप्न भंगले?

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT