मुंबई

महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर!

CD

महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : बोरिवलीतील बेस्ट बस आगारासाठी आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात झालेल्या दिरंगाईचे पडसाद महापालिका प्रशासनात उमटू लागले आहेत. या प्रकरणात महापालिकेच्या कायदा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांच्याकडील विधी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडील संपूर्ण कामकाज संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मिलिंद मोदले यांच्याकडे सोपविण्याचा आदेश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे. त्यामुळे पंजाबी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता. ६) यासंदर्भातील कार्यालयीन आदेश जारी केला.

बोरिवलीतील बेस्ट बस आगारासाठी आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिले होते, मात्र त्याची वेळेत अंमलबजावणी न झाल्याने ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आयुक्त अश्विनी भिडे यांना अवमानाची नोटीस बजावण्यासोबतच महापालिकेला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देशही दिले. या प्रकरणानंतर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल्ल तांबे आणि कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही समोर आले होते. आता कोमल पंजाबी यांच्याकडील विधी खात्याचा संपूर्ण कार्यभार काढून घेतल्याने महापालिका प्रशासनातील कारवाईची व्याप्ती वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT