मुंबई

‘एमपीएससी’च्या पदांत ११ हजारांची वाढ‘एमपीएससी’च्या पदांत ११ हजारांची वाढ

CD

‘एमपीएससी’च्या पदांत ११ हजारांची वाढ
‘गट-क’च्या १६ हजार ७१७ जागांसाठी २४ जानेवारीला पूर्व परीक्षा

 मुंबई, ता. ६ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी पाच हजार ७०७ पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी ११ हजार १० पदांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी (ता. ६) प्रसिद्ध करण्यात आले.
 
राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगास प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे.       या परीक्षेसाठी यापूर्वी २५ जून २०२६ रोजी दोन हजार ६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै २०२६ च्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी तीन हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पदसंख्या पाच हजार ७०७ झाली होती. आता नव्याने ११ हजार १० पदांचा समावेश झाल्याने एकूण पदसंख्या १६ हजार ७१७ झाली आहे.      दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी पात्र उमेदवारांनाही मिळणार आहे.

अर्ज व विकल्प सादर करता येणार!
          वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक अर्हतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना विकल्प सादर करता येणार आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नव्याने अर्ज तसेच विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ मुदत देण्यात आली आहे.
..
२४ जानेवारीला संयुक्त पूर्व परीक्षा
           विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. तसेच पात्र उमेदवारांना पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०२७ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT