मुंबईत शांतता क्षेत्रांत फटाक्यांची आतषबाजी
आवाज फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील ११० शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यास बंदी असतानाही या भागांत फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच फटाक्यांच्या आवाजाची पातळी गेल्या २० वर्षांत कमी झाली असली, तरी ती अद्याप निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आवाज फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २००६ पासून फटाक्यांच्या आवाजाची चाचणी केली जात आहे. जनजागृती आणि नियमांच्या अंमलबजावणीमुळे आवाजाची पातळी कमी झाली असली, तरी ती अद्याप नियमांच्या चौकटीत आलेली नाही. मुंबईत महापालिकेने ११० शांतता क्षेत्रे घोषित केली असून, तेथे फटाके फोडण्यास बंदी आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतही फटाके फोडण्यास मनाई आहे. मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४ ऑक्टोबरच्या ९१ वरून ७ नोव्हेंबरला १०२ वर पोहोचला आहे. काही भागांत तो १६३ नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे.
...
फटाक्यांमध्ये रसायनांचा वापर
फटाक्यांच्या पाकिटांवर आवाजाची पातळी आणि क्यूआर कोड देणे बंधनकारक असतानाही अनेक पाकिटांवर ही माहिती नसल्याचे, तर काही ठिकाणी बनावट क्यूआर कोड असल्याचे फाउंडेशनने निदर्शनास आणले आहे. फटाक्यांमध्ये बेरियमसारख्या प्रतिबंधित रसायनांचा वापर होत असल्याचाही दावा पत्रात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.